Wonder Man 2026 Review in Marathi

Wonder Man 2026 Review in Marathi



Marvel ची Wonder Man २७ जानेवारी २०२६ ला release झाली आणि ही series अपेक्षेपेक्षा खूप वेगळी आणि मजेशीर आहे. ही पूर्णपणे 'Hollywood Satire' आणि 'Superhero drama चे mixture आहे.

या series ची  स्टोरी Simon Williams (Yahya Abdul-Mateen II) भोवती फिरते. Simon एक धडपडणारा actor आणि stuntman आहे. एका विचित्र प्रसंगामुळे लहानपणी त्याला Ionic Powers मिळतात. पण त्याला 'Superhero' बनायची फारशी इच्छा नसते, त्याला फक्त एक मोठा स्टार बनायचे असते. ही series आपल्याला सुपरहिरोच्या जगातील ग्लॅमर आणि त्यामागचे सत्य दाखवते.

Yahya Abdul-Mateen II ने Simon Williams ची भूमिका अतिशय उत्तम साकारली आहे. त्याचा अभिनय खूप natural वाटतो. पण या सिरीजचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे Trevor Slattery (Ben Kingsley). त्याची कॉमेडी आणि Simon सोबतची मैत्री बघायला खूप मजा येते. सिरीजची टोन थोडी हलकी-फुलकी आणि मिश्किल आहे, जी आपल्याला Antman, Shelhulk या series ची आठवण करून देते, पण ही त्यापेक्षा जास्त दर्जेदार आहे.

जर तुम्हाला Marvel चे तेच जुने movies series बघून कंटाळा आला असेल, तर Wonder Man तुमच्यासाठी एक फ्रेश अनुभव आहे. यामध्ये अ‍ॅक्शन कमी आणि ड्रामा जास्त आहे, पण तो कुठेही कंटाळवाणा होत नाही.

नक्की बघा!

Wonder Man ची ही सिरीज MCU च्या भविष्यातील 'West Coast Avengers' साठी एक भक्कम पाया रचते असे वाटते. तसंच, सिरीजमधले 'Cameos' तुम्हाला नक्कीच खुश करतील!

FOLLOW US ON SOCIAL MEDIA!

Regular Memes, News & Movie Reviews Posting..